व्हिलेनची भुमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात लोकांसाठी एक आदर्श बनला आहे. सोनू सूदचा अॅक्शन आणि रोमॅंटिक चित्रपट फतेह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून यात अॅक्शन रोमान्स आणि धमाकेदार सीन्स या ट्रेलरमध्ये पहायला मिळणार आहेत. या दुसऱ्या ट्रेलरमध्ये सोनू सूदचा एक वेगळा दमदार अभिनय दिसून येत आहे.
अभिनेता सोनू सूद याचा फतेह चित्रपट 10 जानेवारी 2025 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह आणि विजय राज सारखे प्रसिद्ध कलाकारही आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.