परदेशात जाणाऱ्या नागरिकांवर मोदी सरकारची नजर, 19 प्रकारची खासगी माहिती द्यावी लागणार

ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईआडून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यांना तुरुंगात डांबणाऱ्या मोदी सरकारची नजर आता परदेशात जाणाऱ्या नागरिकांवर असणार आहे. परदेशात जाणाऱ्या नागरिकांकडून सरकार 19 प्रकारची खासगी माहिती पुराव्यादाखल मागवून घेणार आहे. परदेशात कधी गेला, खर्च कुणी केला, किती बॅगा घेऊन गेलात आणि विमानात कुठल्या सीटवर बसला होता, अशी विविध प्रकारची माहिती नागरिकांना सरकारला द्यावी लागणार आहे.

ही माहिती द्यावी लागणार

  • मोफत तिकीट किंवा सवलतीच्या दरात तिकीट मिळाले असेल तर त्याबद्दल आणि अपग्रेडेशनबद्दलची माहिती.
  • एका पीएनआर क्रमांकावर किंवा कोडवर किती प्रवाशांनी प्रवास केला.
  • प्रवाशाचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, आरक्षित तिकिटाची माहिती.
  • तिकिटाचे पैसे कसे दिले. क्रेडिट कार्डने दिले असतील त्याचा क्रमांक किंवा इतर कुठल्याही माध्यमातून दिले असतील त्याची माहिती.
  • पीएनआर प्रवासाची योजना.
  • ट्रॅव्हल एजन्सी किंवा ट्रॅव्हल एजेंटची माहिती.
  • जर एका एअरलाईनने तिकीट दुसऱ्या एअरलाईनला विकले असेल तर कोड शेअरिंगची माहिती.
  • एका पीएनआरवर दुसऱ्या पीएनआरचा रेफरन्स असेल तर त्याची माहिती.
  • प्रवासाची सद्यस्थिती.
  • सामानाची माहिती.
  • सीटची माहिती नंबरसहीत.
  • तिकिटावर मिळालेल्या इतर सवलतींची विस्तृत माहिती.
  • प्रवाशाचे नाव, पासपोर्ट क्रमांक, जन्म दिनांक आणि लिंग इत्यादी.
  • दिलेल्या माहितीत काही बदल असेल तर त्याबद्दलची माहिती.