लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 40 लाख नवीन मतदार वाढले? नवीन मतदारांचा विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा

2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. पण विरोधकांनी ईव्हीएमवर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने नुकतीच लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जारी केली आहे. लोकसभा निवडणूक आणि राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक्सवरील युजर तन्मोयने काही फॅक्ट्स पोस्ट केले आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदार वाढले. ही वाढ इतकी होती की आधीच्या निवडणुकांपूर्वी अशी वाढ कधीच पहायला मिळाली नाही

नुकतंच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जारी केली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत 40 लाख 81 हजार 229 नवीन मतदार जोडले गेले आहेत. आधीच्या निवडणुकांमध्ये कधीही अशी वाढ झालेली पाहिली गेली नाही. ही संख्या इतकी मोठी आहे की गेल्या पाच वर्षांच्या अंतरातही जेवढे मतदार जोडले गेले नाही तेवढे या सहा महिन्यांच्या अंतरात वाढले गेले आहेत.

या मतदारांकडे बारकाईने पाहिल्यास हे लक्षात येील की केवळ 78 विधानसभा मतदारसंघात 18 लाख नवीन मतदार वाढले गेले आहेत. आणि या 78 पैकी 68 जागांवर भाजपचा विजय झाला आहे.