लग्नाला चाललेला वऱ्हाडाचा ट्रक नदीत कोसळला, 66 जणांचा दुर्दैवी मृत्यू

लग्नाला चाललेला वऱ्हाडाचा ट्रक नदीत कोसळून 66 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. इथियोपिया येथे हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लग्नाचे वऱ्हाड ट्रकमधून विवाहस्थळी चालले होते. दूरदराज परिसरातील नदीवरील पुलाची दयनीय अवस्था, रस्त्यांची दुर्दशा यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक नदीत कोसळला. तथापि ट्रकही जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. यामुळे अपघातानंतर ट्रकचा चक्काचूर झाला.

अपघातात 64 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.