झूम बराबर झूम… तळीरामांनो निश्चिंत राहा, दारू पिऊन झिंगल्यावर पोलीस मारणार नाही तर घरी सोडणार

उद्या थर्टी फर्स्ट. त्यामुळे अनेक तळीरामांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. अनेकांना दारु प्यायल्यावर पोलिसांची भिती असते. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर दारु पिऊन झिंगलात तर पोलिस तुम्हाला मारणार नाहीत तर तुम्हाला तुमच्या घरी सुखरुप सोडतील.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक हिमाचलच्या शिमल्यात जमतात. यावेळी काही लोक दारू पिऊन झिंगतात. अशा लोकांना मारू नका आणि अटक करू नका असे आदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांनी दिले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सुख्खू म्हणाले की, नव्या वर्षाचे स्वागत करताना कोणी दारू पिऊन झिंगत असेल, तर पोलिसांनी त्यांना मारू नये आणि तुरुंगात टाकू नये. त्यांना प्रेमाने समजवावे आणि घरी सोडावे. 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत सिमला कार्निव्हल महोत्सव असणार आहे. या काळात सर्व पर्यटकांचे स्वागत आहे. आम्ही पोलिसांनी सांगून ठेवले आहे की जे लोक आपल्या कुटुंबीयांसोबत येतात आणि दारू पिऊन झिंगतात, त्यांना प्रेमाना समजवा, त्यांना सुखरुप त्यांच्या हॉटेलला सोडून या. कारण हिमाचल प्रदेशमध्ये आपण अतिथी देवो भवः ही संस्कृती मानतो असेही मुख्यमंत्री सुख्खू म्हणाले.