Good Bye 2024 – कुणी मोडला 29 वर्षांचा संसार तर कुणाच्या घटस्फोटाच्या सुरू आहेत चर्चा

यंदाच्या वर्षात चित्रपटसृष्टी तसेच क्रिडा क्षेत्रात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. काहींच्या आयुष्यात निराशा आली तर काहींची स्वप्न साकार झाली. अनेकजण या वर्षी विवाहबंधनात अडकले. त्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी आनंदाचे होते. मात्र अनेकांनी या वर्षी आपल्या साथीदारासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यापैकी काही जणाचे घटस्फोट हे त्यांच्या चाहत्यांना धक्का देणारे होते. तर काही घटस्फोट अनपेक्षित होते. त्यामुळे अनेक कलाकार, खेळाडू यांसाठी हे वर्ष संघर्षमय ठरले. आज अशाच काही जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

हार्दिक पांड्या आणि नताशा

हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा यांनी 2024 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 18 जुलै रोजी हार्दिकने स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नताशा व तो वेगळे होत असल्याचे सांगितले आहे. हार्दिक आणि नताशाने 2020 मध्ये लग्न केले होते. तर फेब्रुवारी 2023 मध्ये या कपलने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार दोन वेळा लग्न केले होते. या दोघांनाही अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे. मात्र जुलै 2024 मध्ये हार्दिक आणि नताशाचा 4 वर्षांचा संसार मोडला.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. शोएब मलिक याचे हे दुसरे लग्न होते. ही जोडी बराच काळ चर्चेत राहिली. हैदराबादमध्ये झालेल्या या विवाहानंतर सानियाने शोएबपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तर शोएबने पाकिस्तानी मॉडेल सना जावेदशी विवाह केला आहे.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत

तमिळ सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेतला आहे. 2004 मध्ये त्यांचा लग्न झाले होता.लग्नाच्या 20 वर्षानंतर हे जोडपे घटस्फोटाद्वारे वेगळे झाले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोट प्रकरणावर यापूर्वी तीनदा सुनावणी झाली होती. मात्र तिन्ही वेळा हे जोडपं सुनावणीला गैरहजर होतं. अखेर 27 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाला मान्यता दिली.

एआर रहमान आणि सायरा बानो

सुप्रसिद्ध संगीतकार एआर रहमान आणि पत्नी सायरा बानू यांनी 29 वर्षांनतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हे दोघे 1995 साली लग्नबंधनात अडकले होते. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोट होणार असल्याची माहिती दिली.

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर  

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि पती मोहसिन अख्तर मीर यांनी देखील 2024 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 8 वर्षांनंतर हे दोघेही विभक्त झाले आहेत. 2014 मध्ये उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांची पहिली भेट बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या भाचीच्या लग्नात झाली होती. यानंतर त्यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. यानंतर 2016 मध्ये उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर याचे लग्न होते.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा 

हिंदुस्थानी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे देखील विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. युजवेंद्रने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एकाकीपणा आणि नवीव सुरुवातींबाबत पोस्ट शेअर केली होती. यावरुन
चहल आणि धनश्री यांच्यात काही तरी बिनसले असल्याच्या चर्चांना उधाण आले. याशिवाय गेल्या अनेक महिन्यांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात ते एकत्र दिसलेले नाहीत. सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असली तरी या कपलने स्वत: याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • Beta

Beta feature

  • Beta

Beta feature

  • Beta

Beta feature

  • Beta

Beta feature

  • Beta

Beta feature

  • Beta

Beta feature