”हिंदुस्थान सुरक्षेच्या बाबतीत भाग्यवान नाही, त्यामुळे जवानांनी अंतर्गत व बाह्य शत्रूंवर बारीक नजर ठेवून रहावे, असे वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. राजनाथ सिंह हे इंदूरमधील मध्य प्रदेशमधील महू कॅन्टोन्मेंटच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते त्यावेळी जवानांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
”सुरक्षेचा विचार करता हिंदुस्थान तसा फारसा भाग्यशाली नाही. आपली उत्तर व पश्चिम सीमा सतत आव्हांनाना तोंड देत असते. बाह्य आव्हांनासोबतच अंतर्गत आव्हानं देखील आहेतच. त्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत आपण गाफील राहू शकत नाही. आपल्या अतंर्गत व बाह्य दोन्ही शत्रूंवर कडक नजर ठेवावी लागेल. त्यांच्या हालचाली टिपून वेळ आल्यास योग्य कारवाई करावी लागणार, असं राजनाथ सिंह म्हणाले.