आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीत धारावी रिडेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. मात्र आता अचानक या कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. डीआरपीपीएलऐवजी आता या कंपनीचे नाव ‘एनएमडीपीएल’ करण्यात आले आहे.
14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
नववर्ष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात आणि सर्वत्र गर्दी होते. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील 14 निवडक स्थानकांवर 29 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकांचा समावेश आहे.