वैमानिक तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला जामीन

वैमानिक सृष्टी तुली हिच्या आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर आदित्य पंडितला शुक्रवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सृष्टी मरोळ येथे भाडय़ाच्या घरात राहत होती. त्या घरात 25 नोव्हेंबरला ती मृतावस्थेत आढळली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्यविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. सृष्टी मांसाहारी होती, तर आदित्य शाकाहारी आहे. त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा. याच वादातून आदित्यने सृष्टीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.