बीडमधील मस्साजोगचे सरपंज संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य़ हादरले आहे. अनेक भागांमधून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चे आंदोलनं केली जात आहेत. या घटनेविरोधात शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चात संतोष देशमुख यांची धाकटी कन्या वैभवी देशमुख देखील सहभागी झाली होती. हा मोर्चा श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चा मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, या मोर्चात वैभवी सतत हमसून हमसून रडत होती. तिचे ते अश्रू पाहून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले होते. वैभवीने तिच्या वडिलांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्व दोषींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी केली आहे.
1 जानेवारीला चक्का जाम आंदोलन
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारने ठोस पाऊल उचलले नाही तर तर एक जानेवारीला रेणापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार. तसेच या प्रकरणाचा निकाल लागपर्यंत मुंडे बहीण भावाने मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही या मोर्च्यातून करण्यात आली आहे.