महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघांमध्ये 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला. या 118पैकी 102 मतदारसंघांत भाजप उमेदवार विजयी झाले आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीचा दारुण पराभव झाला. पण त्यानंतर पाचच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. यामागे ईव्हीएममध्ये झोल झाल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. विरोधी पक्षांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. आता मतदार यादीतील घोळ समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत फेरबदल

बेळगाव येथे काँग्रेस वर्पिंग कमिटीची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गडबडीचा उल्लेख केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.