सहा महिन्यांनी लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जाहीर, निवडणूक आयोगाने इतका उशीर का लावला? विरोधकांचा सवाल

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी जाहीर करण्यात इतका उशीर का लागला, असा सवाल आता विरोधक करत असून याबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण 97 कोटी 97 लाख 51 हजार 847 नोंदणीकृत मतदार होते. 2019 साली 91 कोटी, 19 लाख 50 हजार 734 मतदार होते. 2019 च्या तुलनेत 2024 साली मतदारांच्या संख्येत 7.43 टक्क्यांनी वाढ झाली. 2024 साली 64 कोटी 64 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 2019 साली 61 कोटीचार लाख मतदारांनी मतदान केले होते.

ईव्हीएम आणि पोस्टल मतदान 64 कोटी 64 लाख 20 हजार 869

ईव्हीएमद्वारे मतदान      64 कोटी 21 लाख 39 हजार 275

पुरुष                               32 कोटी 93 लाख 61 हजार 948

महिला                            31 कोटी 27 लाख 64 हजार 269

तृतीयपंथी                       13 हजार 058

आसाममध्ये सर्वाधिक मतदान; जम्मूकश्मीरमध्ये सर्वात कमी

आसामच्या धुबरी मतदान पेंद्रावर सर्वाधिक म्हणजेच 92.3 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी 18.7 टक्के  मतदान जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमध्ये झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत म्हटले आहे. 2024 मध्ये 65.78 महिलांनी मतदान केले होते तर 65.55 टक्के पुरुषांनी मतदान केले होते. 2019 आणि 2024 साली पुरुषांपेक्षा महिलांनी सर्वाधिक मतदान केले होते. दरम्यान, 2024 साली 800 महिला तर महाराष्ट्रात 111 महिलांनी निवडणूक लढवली.