महाराष्ट्राच्या केया हटकर आणि करीना थापा यांना बाल पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. अपंगत्वावर मात करून साहित्य क्षेत्र गाजवणाऱ्या मुंबईच्या केया हटकर या 14 वर्षीय लेखिकेचा आणि एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीतून जिवाची बाजी लावून 70 जणांचा जीव वाचवणाऱया अमरावतीच्या करीना थापा यांचाही या वेळी गौरव झाला. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 17 मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यात 7 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण या सात श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

अपंगत्वार मात करणारी केया

मुंबईची केया हटकर स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या ‘डान्सिंग ऑन माय व्हील्स’ आणि ‘आयएम पॉसीबल’ या दोन्ही पुस्तकांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले. तिच्या साहित्य आणि सामाजिक कार्याची दखल घेत तिला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

70 जणांना वाचवणारी करीना

अमरावतीतील जय अंबा अपार्टमेंटमध्ये सिलेंडरचा स्पह्ट होऊन भीषण आग लागली. तिने तत्काळ वडिलांना याबाबत माहिती देऊन अपार्टमेंट मालकाला कळवले. त्यानंतर तिने बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सिलेंडर बाजूला केला. आग विझवली. त्यामुळे मोठा स्पह्ट होण्याची भीती टळली. वडील सुरक्षा रक्षक असल्याने त्यांनीही आग विझवण्यासाठी तिला मदत केली. त्यामुळे अपार्टमेंटमधील 70 जणांचे प्राण वाचले.