प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात 226 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात तीन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत खद्राला येथे 5 सेमी, पुह येथे 2 सेमी, सांगला येथे 1.2 सेमी, तर केलाँग येथे 1 सेमी बर्फवृष्टी झाली. राज्यात अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान तब्बल उणे 10.6 अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे.