नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने मुंबईकर नागरीक आणि पर्यटक मुंबईतील समुद्र किनारी, प्रेक्षणीय स्थळी दाखल होतात. पर्यटनस्थळी होणारी नागरिकांची गर्दी आणि परतीचा प्रवास करताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर विशेष लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान मंगळवारी रात्री 1.15, 2, 2.30, 3.25 आणि विरार ते चर्चगेटदरम्यान रात्री 12.15, 12.45, 1.40, 3.05 या वेळेत आठ विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तर मध्य रेल्वेवर मंगळवारी मध्यरात्री 1.30 वाजता सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते सीएसएमटी लोकल चालवण्यात येईल. तसेच हार्बर मार्गावरून मध्यरात्री 1.30 वाजता सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी लोकल चालवण्यात येईल. या विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.