बॉसच्या नावाने एक मेसेज अन् तरुणीने गमावले 56 लाख; सायबर गुन्हेगारांची दहशत

हिंदुस्थानची आयटी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूमध्ये मागील काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आता बॉसच्या बनावट मेसेजने तरुणीला तब्बल ५६ लाख रुपयांचा गंडा घातला. सायबर गुन्ह्यांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करुनही बरेचसे लोक जाळ्यात अडकतात. याचाच प्रत्यय देणारी घटना बंगळुरूतील एका टेक कंपनीत मुख्य लेखा अधिकारी म्हणून काम करणार्‍या तरुणीसोबत घडली. या घटने मुळे तीला धक्का
बसला.

असा केला बनाव

मी एमडी असून एक प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याने ५६ लाख रुपयांची सुरक्षा ठेव द्यावी लागेल. त्यासाठी कंपनीच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर कर, असा मेसेज ग्लोरिया हिला प्राप्त झाला. मग तिने ताबडतोब २ खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केली.

कंपनीचा लोगो लावून फसवणूक

कोण लगेच पैसे कसे पाठवेल यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी सायबर गुन्हेगारांनी रचलेला कट पाहून त्यांच्या दहशतीचे गांभीर्य लक्षात येते. व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलला टेक कंपनीच्या एमडीचा फोटो आणि कंपनीचा लोगो लावण्यात आला होता.