अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ते टेक्सासमधील रिओ ग्रँड या नदीच्या काठावर नवीन शहर वसवत आहेत. आपल्या कर्मचार्यांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याची मस्क यांची योजना आहे. मागील काही दिवसांपासून टेक्सास येथे मस्क त्यांच्या कंपनीचा विस्तार करत असून कॅलिफोर्निया येथून त्यांच्या कंपनीशी संबंधित संस्थांचे स्थलांतर टेक्सास येथे करण्यात आले. मस्क यांच्या स्पेसएक्सने एक दशकापासून टेक्सासच्या किनार्यावर काम सुरू केले. तेव्हापासून येथे हजारो नोकर्या निर्माण झाल्या असल्याचे वृत्त आहे. ‘स्टारबेस’ नावाची अनेक घरे उभारण्यात आली असताना आता इथे नवीन शहर वसवणे हे मस्क यांचे लक्ष्य आहे. दरम्यान, किना्रयावर वसलेले शहर अशी स्टारबेसची ओळख असेल. खुद्द मस्क यांनी हे नाव ठरवले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, स्टारबेस साइटवर ३,४०० हून अधिक स्पेसएक्स कर्मचारी आणि कंत्राटदारांचे वास्तव्य आहे. स्पेसएक्स लॉन्च साइट म्हणून ओळख असलेल्या या जागेवर शहर वसवण्यावर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे.
ह २०२१ मध्ये सर्वप्रथम याबाबत स्थानिक अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. याआधी कंपनीने टपाल वितरणाच्या उद्देशाने या क्षेत्राचे नाव बदलण्याची विनंती केली होती. याबाबतचा अर्ज फेडरल एजन्सीकडे प्रलंबित आहे. मात्र, मस्क यांनी किनार्यावर शहर वसवण्याची योजना आखल्याने त्यांना विशेष लाभ मिळेल असे अपेक्षित आहे.
कुठे आहे स्टारबेस?
अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे स्टारबेस उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिम किना्रयाजवळ दक्षिण टेक्सासमधील कॅमरोन काउंटीमध्ये स्थित आहे. हा महामार्ग बोका चिका या छोटया शहराजवळ आहे. या परिसरात विविध पर्यटनस्थळे असल्याने मस्क यांनी शहर वसवण्यासाठी मोक्याचे ठिकाण निवडल्याचे सांगितले जाते.