जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि हिंदुस्थानचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मसूद अझहर याला अफगाणिस्तानात हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. मसूद हा अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. येथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला, सध्या त्याला पुढील उपचारासाठी पाकिस्तानात आणण्यात आले आहे. त्याच्यावर कराचीतील मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्लामाबादहून हृदयरोगतज्ज्ञ उपचारासाठी येत आहेत. त्याला लवकरच रावळिंपडीला पाठवले जाऊ शकते. दरम्यान, नुकतेच मसूदचे एक भाषण व्हायरल झाले. हे भाषण जैशच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर झाले होते. यात त्याने हिंदुस्थान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात बोलला होता. मोदींसारखा दुबळा माणूस आपल्याला आव्हान देतो किंवा नेतन्याहूंसारखा उंदीर आमच्या कबरीवर नाचतो… मला सांगा माझी बाबरी परत मिळवण्यासाठी ३०० लोकही लढू शकत नाहीत, असे मसूद म्हणाला होता.