Jalna Crime – जागचा हललास तर ठार मारीन… होणाऱ्या नवऱ्याला धमकावत नराधमाने तरुणीवर केला बलात्कार

बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भयंकर घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. कल्याणनतंर आता जालन्यामध्ये बलात्काराची भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे होणाऱ्या नवऱ्यासमोरच नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी पीडित तरूणी होणारा नवरा मंगेशला (बदलेले नाव) भेटण्यासाठी रात्री आठच्या सुमारास जालन्यातील नूतन वसाहात येथे जेवणाचा डब्बा घेऊन गेली होती. जेवण झाल्यानतंर पीडिता आणि मंगेश दोघेही रेल्वेच्या भुयारी पुलाखालून घरी निघाले होते. याचवेळी पीडितेच्या ओळखीच्या प्रेम रवी पाचगे या नराधमाने त्यांची वाट आडवली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, बाजूला चल असे म्हणत त्याने तरुणीवर जबरदस्ती करत तिला भुयारी पुलाच्या बाजूला असलेल्या नाल्याकडे घेऊन गेला. तसेच जागेवरून हाललास तर ठार मारीन अशी धमकी त्याने मंगेशला दिली व पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर दोघांनीही कशीबशी त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली व जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमित म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे, पोलीस हवालदार नंदकिशोर ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तातडीने सूत्रे हालवली आणि रात्रीच आरोपी प्रेम पाचगे याचा शोध घेऊन, त्याला अटक केले आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 64, 351 (2) (3) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे करीत आहेत.