श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. यामुळे मंदिराला पुरातन स्वरूप प्राप्त होणार आहे. या कामात भाविकही हातभार लावत आहेत. विठ्ठलभक्ताने दान केलेल्या 30 किलो चांदीतून संत नामदेव पायरीवरील मंदिराच्या प्रवेशद्वाराला चांदीची झळाळी मिळणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलभेटीची ओढ लागलेले लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. लाडक्या विठ्ठलासाठी आपल्या परीने दानही देतात. मंदिर प्रशासनाला देणगी स्वरूपातही रक्कम दिली जाते. पंढरीत सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून, याअंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता.