पुण्यातील मुळा मुठा नदीत मृत माशांचा खच, चौकशी सुरू

पुण्यातील मुळा मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे नदीची परिसंस्था बिघडत चालली असून यावर पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. रिवर रिवाईवल संघटनेचे काही स्वयंसेवक पाहणीसाठी आले होते, त्यांचा निदर्शनास हा मृत माशांचा खच दिसल्यानंतर ही बाब समोर आली.

संगमवाडी, नाईक बेट आणि विनायक नगर जवळच्या नदी पात्रात हे मृत मासे सापडले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात नदीचे प्रदूषण आणि चुकीचे कचरा व्यवस्थापन समोर आले आहे. या पाण्याचे नमुने तपसाणीसाठी पाठवल्याचे पुणे प्रशासनाने सांगितले आहे. या घटनेची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला माहिती देण्यात आली आहे. तसेच स्थानिक सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची तपासणी सुरू आहे.