राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीला सुरुवात झाली. मात्र, थंडीचा लहरीपणा सुरू असून या आठवड्यात वातावरणात अचानक उष्णता वाढली. मात्र, पहाटे आणि रात्रीत हवामानात गारवा होता. आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर वाढत आहे. तर विदर्भावर ढग दाटले असून येत्या दोन दिवसात तेथे अवकाळी पावसाची शक्यता आहे.
नागपूरसह विदर्भात बहुतेक ठिकाणी सोमवारीपासून ढगाळ वातावरणासह हलके धुके दिसत होते. रविवारी 11 अंशावर असलेला नागपूरचा पारा 24 तासात 14.6 अंशावर गेला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात दोन दिवस माफक थंडी, त्यानंतर पाऊस आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पूर्वेकडील वाऱ्यांची स्थिती आणि ढगाळ हवामान यामुळे 27, 28 डिसेंबर रोजी मध्य भारतासह विदर्भात गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस, 26-28 डिसेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
25 Dec पुढील 3 दिवस, 26-28 डिसेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
♦27 डिसेंबर,त्याच प्रदेशात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. IMD द्वारे हवामान सूचना पहा. विदर्भात ही@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/9nVnFO9uXI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2024
पुढील 4-5 दिवस नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता कायम आहे. 25 व 26 डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी कमी होवून ऊबदारपणा जाणवेल. त्यानंतर 26 ते 28 डिसेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया चंद्रपूर, वाशिम, शेगाव, तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते. वर्षाअखेरीस म्हणजे 30 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होत नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.