दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? असा सवाल केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट करून विचारला आहे. केजरीवाल हे भाजप नेते प्रवेश सिंह वर्माबद्दल बोलत होते.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही भाजपवर टीका केली आहे. आतिशी यांनी आरोप केला की प्रवेश वर्मा यांनी आपल्या निवासस्थानावर महिलांना 1100 रुपये वाटले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेश वर्मा यांना भाजप दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू शकतात असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या जनतेला असा मुख्यमंत्री हवा आहे का असे केजरीवाल म्हणाले.