कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करून विशाल गवळी या नराधमाने मुलीचा खून केला आहे. पोलिसांनी विशाल गवळीला अटक केली असून त्याचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. गवळीने अनेक मुलींना त्रास दिल्याचे समोर आले आहे. त्याची कल्याणध्ये इतकी दहशत होती की अनेक कुटुंबांना आपलं राहतं घर सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागवला. धक्कादायक म्हणजे यात गवळीच्या पत्नीनेह गवळीला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार विशाल गवळीची तीन लग्नं झाली आहेत. गवळीच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. गवळीने कल्याण पूर्वमध्ये अनेक मुलींना त्रास दिला होता. गवळीवर मुलींची छेड काढणे, बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. गवळीची एवढी दहशत होती की अनेक कुटुंबांनी परिसरातून आपली घरं सोडून दुसरीकडे आश्रय घेतला.
गवळीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिच्यावर अत्याचार करून तिचा खूनही केली. पीडित मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गवळीच्या पत्नीनेच मदत केल्याचे समोर आले आहे. गवळीची आधी दोन लग्न झाली असून ही त्याची तिसरी पत्नी. गवळीची पत्नी एका खासगी बँकेत काम करत होती. गवळीने आपल्याला सोडू नये म्हणून त्याच्या पत्नीन त्याला साथ दिली.
गुन्हा करून विशाल गवळी शेगावला पळून गेला. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शेगाव पोलिसांना कळवले. शेगावला एका सलूनमध्ये विशाल दाढी करण्यासाठी बसला होता. दाढी करून ओळख बदलून विशाल फरार होण्याचा प्रयत्न करणार होता. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने गवळीला अटक केली आहे. नवऱ्याला साथ दिली म्हणून पोलिसांनी गवळीची पत्नी साक्षी गवळीलाही अटक केली आहे.