टार्गेट पूर्ण करण्यासाठी चीनमधील एका कंपनीने कहर केला. टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून तिखट लाल मिरची खाण्याचे फर्मान काढले. कंपनीच्या या नव्या फर्मानविरुद्ध कर्मचाऱ्यांनी दबक्या आवाजात निषेध केला आहे.
चीनमधील चेंगदू येथील एका कॉर्पोरेट कंपनीत कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा अजब निर्णय लागू करण्यात आला आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाङ्गी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. जे कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नाही त्यांना लाल मिरची खायला सांगितले जात आहे.
कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी आपले टार्गेट पूर्ण केले नाही. त्यामुळे कंपनीने त्यांना लाल मिरची खाण्यास सांगितले. मिरच्या खाल्ल्यानंतर या दोन महिला कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.