कझाकिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, पक्ष्यांच्या थव्याला धडकलं अन्… Video viral

कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळले आहे. हा अपघात झाला तेव्हा विमानातून 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर प्रवास करत होते.

अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियातील गोन्झीकडे हे विमान मार्गस्थ झाले होते. मात्र दाट धुक्यामुळे विमान पक्ष्यांच्या थव्याला धडकले आणि पायलटने इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला. यावेळी विमान अनियंत्रित झाले व कोसळले. अपघातानंतर विमानाचे तुकडेतुकडे झाले असून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अझरबैजानची राजधानी बाकू येथून एबरेयर 190 (जे-2 – 8243) विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र दाट धुक्यामुळे पायलटने विमान गोन्झीकडे वळवले. याचवेळी विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली आणि विमान अनियंत्रित झाले. त्यानंतर हे विमान अकातू विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर कोसळले. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाचे तुकडे झाले. विमानातील जवळपास 42 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी सुदैवाने वाचल्याचेही वृत्त आहे.