कुर्ला बेस्ट बस भीषण अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याची कुर्ला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 51व्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे संजय मोरे याने जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. कुर्ला येथे 9 डिसेंबरच्या रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. चालक संजय मोरे याने हयगयीने व वेगात बस चालवून 21 वाहनांसह अनेक नागरिकांना धडक दिली होती. यात नाहक 9 जणांचा जीव गेला. मोरेच्या जामीन अर्जावर 2 जानेवारीला सुनावणी होणार असल्याचे अॅड. समाधान सुलाने यांनी सांगितले.