हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला खाद्यपदार्थांच्या वैविध्यपूर्णतेसाठीही ओळखले जाते. 2024 या वर्षात घरबसल्या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांनी ‘स्विगी’वर विश्वास दाखवला. एका व्यक्तीने तर एकाच दिवशी 19,960 रुपयांचे 75 व्हेज पिझ्झा मागवले. यंदाच्या वर्षात तब्बल 1.4 दशलक्ष व्हेज पिझ्झा ऑर्डर्ससह मुंबई देशाची पिझ्झा राजधानी ठरली. चिकन रोल, पोटॅटो फ्राइज आणि व्हेज सँडविच यांसारख्या पदार्थांची मुंबईकरांनी चव चाखली.
दरम्यान, मुंबईचे यंदाच्या वर्षातील सर्वांत मोठे बिल 45,724 रुपये ठरले. नाश्त्यासाठी ग्राहकांनी दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना पसंती दिली. यामध्ये मेंदूवडा, इडली, डोसा यांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक केक्सही याच शहरात मागवण्यात आले. दिवाळी आणि दुर्गापूजा या सणांवेळी मोठय़ा प्रमाणात गोड पदार्थांची ऑर्डर देण्यात आली.
‘2024 या वर्षात देशातील नागरिकांनी स्विगीमार्फत विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. मुंबईकरांनी स्विगीवर सर्वाधिक विश्वास दाखवला. आमच्या ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवल्याचा खूप आनंद होतो. पुढेदेखील आम्ही अशीच सेवा देत राहू’, असे स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य व्यवसाय अधिकारी सिद्धार्थ भकू यांनी सांगितले.