अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर हायब्रीड मॉडेलचा मुलामा चढताच हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित, बहुचर्चित लढतीला शुक्रवारचा मुहूर्त लाभला आहे. पाकिस्तानसह दुबईत रंगणाऱया या स्पर्धेतील हिंदुस्थानच्या लढती दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जातील. एकूण 18 सामने या स्पर्धेत खेळविले जाणार असून हिंदुस्थानचे तिन्ही साखळी सामने दुबईत खेळविले जातील. तसेच एक उपांत्य सामना दुबईतच होणार असून अंतिम सामनाही इथेच खेळविला जाणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. मात्र हिंदुस्थानचा संघ साखळीतच बाद झाला तर अंतिम सामना लाहोरला खेळविला जाईल आणि बाद फेरी गाठली तर हा सामना दुबईला स्थलांतरित केला जाणार असल्याची दिली. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्याला राखीव दिवस ठेवण्यात आल्याची माहिती आयसीसीने दिली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी कार्यक्रम
अ गट – हिंदुस्थान, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट – द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
दिनांक सामना ठिकाण
19 फेब्रु. पाकिस्तान – न्यूझीलंड कराची
20 फेब्रु. बांगलादेश – हिंदुस्थान दुबई
21 फेब्रु. अफगाणिस्तान – द. आफ्रिका कराची
22 फेब्रु. ऑस्ट्रेलिया – इंग्लंड लाहोर
23 फेब्रु. हिंदुस्थान – पाकिस्तान दुबई
24 फेब्रु. बांगलादेश – न्यूझीलंड रावळपिंडी
25 फेब्रु. ऑस्ट्रेलिया – द. आफ्रिका रावळपिंडी
26 फेब्रु. अफगाणिस्तान – इंग्लंड लाहोर
27 फेब्रु. पाकिस्तान – बांगलादेश रावळपिंडी
28 फेब्रु. अफगाणिस्तान – ऑस्ट्रेलिया लाहोर
1 मार्च द. आफ्रिका- इंग्लंड कराची
2 मार्च न्यूझीलंड – हिंदुस्थान दुबई
4 मार्च पहिला उपांत्य सामना दुबई
5 मार्च दुसरा उपांत्य सामना लाहोर
9 मार्च अंतिम सामना लाहोर
(हिंदुस्थान पात्र ठरल्यास सामना दुबईमध्ये
10 मार्च राखीव दिन लाहोर