ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी यांचे निधन

ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी (72) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर अनिता दळवी यांचे ते पती होत. अशोक दळवी हे राज्यस्तरीय कबड्डीपटू होते. डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. एकता मित्र मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या पार्थिवावर शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 27 डिसेंबर रोजी गणेश मंदिर, फडके रोड येथे सकाळी 7.30 वाजता होणार आहे. तसेच उत्तर कार्य 29 डिसेंबर रोजी 3, दुर्गा दर्शन अपार्टमेंट, पांडुरंग वाडी, साईबाबा मंदिराजवळ, डोंबिवली पूर्व येथे राहत्या घरी सकाळी 10 वाजता होणार आहे.