‘प्रत्येक मशिदीखाली राम मंदिर असल्याचा दावा करून कसे चालणार?’ या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यानंतर आता महंत रामभद्राचार्य यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. मोहन भागवत यांना जे म्हणायचे आहे ते त्यांचे व्यक्तिगत म्हणणे असू शकेल. ते काही हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत, असे महंत रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.
आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत किंवा आपण त्या ताब्यात घेतल्या पाहिजेत. मग साम-दाम-दंड-भेद असा कुठलाही मार्ग वापरावा लागला तरी चालेल. आपल्या संस्कृतीचा वारसा ताब्यात घेतलाच पाहिजे, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. मोहन भागवत काही हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. हिंदू धर्माची व्यवस्था ही हिंदू आचार्यांच्या हाती आहे. कुठल्याही एका संघटनेच्या प्रमुखांच्या हाती नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.