भाजप ईडी, सीबीआय सारखी अस्त्र वापरणार; खासदार अरविंद सावंत यांची टीका

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनद्गार काढले. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे. तसेच भाजप निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सारखी अस्त्र वापरणार अशी टीकाही सावंत यांनी केली.

अरविंद सावंत म्हणाले की, सत्तेवर बसलेली भाजप ही स्वबळावर सत्तेत नाहिये. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. भाजप वन नेशन वन इलेक्शन, वक्फ बोर्ड कायद्यासारखे आपले अजेंडे राबवू पाहत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनद्गार काढले. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे. यामुळे लोकांच्या मनात रोष आहे. तसेच अशा स्थितीत भाजपला सरकार चालवायचं आहे. तेव्हा भाजप निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सारखी अस्त्र वापरणार असेही सावंत म्हणाले.