हेच का राज्य सरकारचे युवा धोरण, कंत्राटी नोकरभरतीवर रोहित पवार यांचा सवाल

अनेक कंत्राटी नोकरदारांना पगार मिळाले नाहीत. यावर सरकारचे हेच युवा धोरण आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, एकतर कायम नोकऱ्या द्यायच्या नाहीत, त्यातही कंत्राटी नोकरीवर घ्यायचे आणि पगार द्यायचा नाही, हे या राज्य सरकारचे युवा धोरण आहे का?

तसेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणुक झाल्याची भावना राज्यातील युवक बोलून दाखवत आहेत. कामावर घेऊन 3 महिने झाले पण पगार देण्यात आला नसून अद्यापी पगार देण्याबाबत कसलीही हालचाल दिसून येत नाही. परिणामी संबंधित उपक्रमात सहभागी असलेल्या युवांना मोठा मानसिक ताण सहन करावा लागतो आहे. तरी सरकारने संबंधित प्रश्न तात्काळ निकाली काढून मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील युवांचा पगार द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केला आहे.