काय सांगता! पुरुष शिक्षकाला मिळाली प्रसूती रजा

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे पुरुष शिक्षकाला प्रसूती रजा मिळाली. शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे जितेंद्र कुमार सिंह या पुरुष शिक्षकाला चक्क प्रसूती रजा देण्यात आली. ही बाब उघड होताच बिहारच्या शिक्षण विभागावर सडकून टीका होत आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे.

बिहारच्या शिक्षण विभागाच्या ई-पोर्टलवर या रजेची माहिती उपलब्ध आहे. या चुकीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली तसेच ही चूक विभाग तातडीने सुधारेल, असे सांगितले. मात्र, घटनेचा दाखला देत नेटकरी बिहार सरकार तथा तेथील शिक्षण व्यवस्थेची जोरदार खिल्ली उडवत आहेत.