महागाईने आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना नववर्षाआधीच आणखी एक जोरदार फटका बसणार आहे. मुंबईकरांचा आवडता वडापाव आता महाग होणार आहे. बेसन, कांदे, लसूण, तेलाचे भाव आधीच वाढले आहेत. यातच आता पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने पावांच्या लादीमध्ये 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बेकरी असोसिएशनने घेतला आहे. या निर्णयामुळे 20 रुपयांना मिळणारी पावाची लादी आता 24 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे वडापावच्या किमतीतसुद्धा एक ते दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.