सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) येत्या मार्चपर्यंत ई-सीम लॉन्च करणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच पुढील वर्षी जूनपर्यंत संपूर्ण देशात 4जी नेटवर्क सेवा पुरवली जाईल. त्यानंतर 5जी नेटवर्क लॉन्च केले जाईल. खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे कमी दर ग्राहकांना आकर्षित करत आहेत. एअरटेल, जिओ यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे 5जी नेटवर्कचे देशभर पसरलेले जाळे हे बीएसएनएलसमोर आव्हान आहे.