फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रो हे दोन फोन स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर आयफोन 15 च्या 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत 57,999 रुपये दाखवत आहे. फोनवर मिळणाऱ्या डिस्काऊंटसंबंधी सविस्तर माहिती फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आयफोन 15 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिला आहे.