महायुती सरकार आल्यानंतर राज्यात बदल्यांचे वारे वाहत आहेत. राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डिग्गीकर यांच्या बदलीनंतर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी वर्णी लागली आहे. एकूण 12 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कुणाची कुठे बदली?
1. अनिल डिग्गीकर यांची अतिरिक्त मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय येथे नियुक्ती
2. डॉ. हर्षदीप कांबळे यांची महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई येथे नियुक्ती
3. डॉ.अनबलगन पी. यांची सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती
4. डॉ. राधाकृष्णन बी. यांची महागेन्को(MAHAGENCO), मुंबईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती
5. संजय दैने यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर येथे नियुक्ती
6. राहुल कर्डिले यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका म्हणून नियुक्ती
7. वनमथी सी. यांची जिल्हाधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती
8. संजय पवार यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती
9. अवश्यंत पांडा यांची जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून नियुक्ती
10. विवेक जॉन्सन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे नियुक्ती
11. अण्णासाहेब दादू चव्हाण यांची महात्मा फुले जिवंदाई आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
12. गोपीचंद मुरलीधर कदम यांची स्मार्ट सिटी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती