काँग्रेसच्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाचे उत्तर, वाचा काय म्हणाले

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर संशय व्यक्त केला. आता निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला उलट उत्तर दिले आहे. निवडणूक संबंधित सर्व माहिती आणि आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे असे आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती आणि फॉर्म 20 हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीवरून प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिले की काँग्रेसने तक्रार केली होती की महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 80 हजार 391 नावं काढून टाकली होती. सरासरी विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 779 मतदार कमी झाले होते. यावर निवडणूक आयोगाने म्हटलंय की संपूर्ण प्रक्रियेनंतरच ही नावं काढून टाकण्यात आली आहेत. या संबंधित नोटीस काढण्यात आली होती, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले गेले, अनेक मतदारांचा मृत्यू झाला होता तर काहींनी आपला पत्ता बदलला होता. त्यामुळे या मतदारांची नावं हटवण्यात आल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.