बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू रविवारी विवाहबंधनात अडकली आहे. उदयपूर येथे हा विवाहसोहळा पार पडला. हैदराबादमधील उद्योगपती व्यंकट दत्ता साई यांच्याशी सिंधूने लग्नगाठ बांधली. सिंधूने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.