चालत्या ट्रॅक्टरवर रील बनवणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. रील बनवताना ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने रोटाव्हेटरमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. अनिल असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोतवाली परिसरात ही घटना घडली. अनिल ट्रॅक्टरला रोटाव्हेटर लावून शेतातील माती सपाट करत होता. यादरम्यान तो इन्स्टाग्रामवर रील बनवत होता. रील बनवत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर तो रोटाव्हेटरमध्ये अडकला. त्याचे शीर धडावेगळे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.