ख्रिसमसवर बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर का बोलत नाहीत? काँग्रेस नेते वेणुगोपाल यांचा सवाल

जेव्हा जेव्हा सांप्रदायिक मुद्दा उपस्थित होतो तेव्हा भाजपची भुमिका एका बाजूला असते असे विधान काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी नाताळनिमित्त सामाजिक सौहार्दाबद्दल बोलत होते. पण ते मणिपूरबद्दल का नाही बोलत? अशी टीकाही वेणुगोपाल यांनी केली.

वेणुगोपाल म्हणाले की, जेव्हा जेव्हा सांप्रदायिक मुद्दा उपस्थित होतो तेव्हा भाजपची भुमिका एका बाजूला असते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळं कायद्यावरून स्पष्ट सूचना दिल्या आहेत. काल पंतप्रधान मोदी नाताळनिमित्त सामाजिक सौहार्दाबद्दल बोलत होते. पण ते मणिपूरबद्दल का नाही बोलत? असा सवाल वेणुगोपाल यांनी विचारला.

तसेच राहुल गांधी हे डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा संदेश लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. राहुल गांधी हे अनूसुचित जाती, जमाती, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील गरीबांसाठी लढत आहेत. भाजपचे नेते फक्त एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहेत. जेव्हा आम्ही या व्यक्तीविरोधात बोलतो तेव्हा भाजपचे खासदार संसद बंद पाडतात, आमचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. जनतेला हे सगळं माहित आहे असेही वेणुगोपाल म्हणाले.