ही तर लाखो विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा, जितेंद्र आव्हाड यांनी फटकारले

राज्यसेवा आयोगातर्फे रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. मात्र PSI पदासाठी 441 जागा रिक्त असताना केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे. तसेच DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाची पदं रिक्त असताना देखील या पदांसाठी भरती काढण्यात आलेली नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका, अशी विनती देखील जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली आहे.

राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाही. राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा. प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका. त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.