सहाव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाने मृत्यूला हरवले, खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार

खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्समध्ये मुदतपूर्व प्रसूतीनंतर केवळ सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जन्म झाला. 23 आठवड्यांतच जन्म झालेला असल्याने त्याच्या फुप्फुस आणि हृदयाची वाढ पूर्णपणे झालेली नव्हती. त्यामुळे बाळाची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनीही उपचारासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. अशा सर्व प्रतिकूल स्थितीवर मात करीत बाळाने मृत्यूला हरवले. खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार आनंद आणि समाधान मिळाल्याने चिमुकल्याची प्रकृती आता ठणठणीत आहे.

24 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बालकांची जगण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रतिमा थमके, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अनिश पिल्लई, डॉ. संजू सिदाराद्दी आणि डॉ. अमित घावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळावर यशस्वी उपचार केले. अखेर 100 दिवसांनंतर 2.26 किलो वजनाचा टप्पा गाठल्यानंतर या बाळाला घरी सोडण्यात आले.

आनंद आणि समाधान

मेंदूचे अल्ट्रासाऊंड, श्रवण चाचण्या आणि न्युरोलॉजिकल चाचण्यांमध्ये चिमुकल्याचे सामान्य परिणाम दिसून आले. बाळ आता विकासानुसार त्यांचे टप्पे गाठत असल्याने डॉक्टरांची टीम आणि पालकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.