वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 

वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात सर्व श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आज वेतनवाढ करार झाला. व्यवस्थापन आणि भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या वतीने स्वाक्षऱ्या होऊन 2023 ते 2027 चा प्रलंबित वेतनकरार झाला. मूळ वेतन, विविध भत्ते, कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने निगडित फायदेशीर भरीव वाढ व विशेष म्हणजे ‘विशेष भत्ता’ पूर्वलक्षी थकबाकीनुसार मिळणार आहे. प्रलंबित वेतनकरार मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेते-खासदार व भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली व कुशल मार्गदर्शनामुळे तर युनिटचे अध्यक्ष महेश लाड यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आज हा वेतनवाढीचा करार झाला.

भारतीय विमा संस्थानचे संचालक माजी सचिव एस. एन. सत्पथी तसेच विद्यमान सचिव जयपुरिया यांच्या सहकार्याने कार्मिक सचिव केदार संत व मनीष रायकर व निवृत्त कार्मिक सचिव नामदेव कोकरे यांच्या भरीव पाठपुराव्यामुळे हा करार झाला. यावेळी महासंघाचे पदाधिकारी संजय शिर्पे, संजय डफळ उपस्थित होते. यासाठी स्थानिक सरचिटणीस शशिकांत भुवड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. वेतनवाढ करारावर व्यवस्थापनाच्या वतीने महासचिव जयपुरिया तर भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या वतीने महेश लाड व शशिकांत भुवड यांनी स्वाक्षरी केली. यावेळी भारतीय विमा कर्मचारी सेना (युनिटचे) सतीश शिंदे, मृणाल साटम, समीर बांदिवडेकर, शिल्पा वैद्य, सीमा तेटांबे, स्पृहा बांदिवडेकर तर प्रशासनाच्या वतीने सचिव केदार संत, सचिव मनीष रायकर, सहाय्यक सचिव अर्चना सावंत उपस्थित होते.