दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग ऊर्फ लांडा आणि गँगस्टर बचितर सिंग उर्फ पवित्र बटालाच्या साथीदाराला राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) सोमवारी मानखुर्द येथून अटक केली. जतिंदर सिंग उर्फ ज्योती असे त्याचे नाव आहे. तो बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या परदेशातील लांडाने तयार केलेल्या दहशतवादी टोळीचा सदस्य आहे.

तपासादरम्यान लखबीर सिंग ऊर्फ लांडा आणि गँगस्टर बचितर सिंग ऊर्फ पवित्र बटाला साथीदाराची माहिती एनआयए ला मिळाली. त्या माहितीच्या आधारे एनआयएने जतिंदर सिंग ऊर्फ ज्योतीला ताब्यात घेऊन अटक केली. जतिंदर सिंग ऊर्फ ज्योती हा मूळचा पंजाबच्या गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. तो मध्य प्रदेश येथील बलजित सिंग ऊर्फ रानभाईकडून शस्त्र खरेदी करायचा. ज्याच्या विरोधात एनआयएने नुकताच आरोपपत्र दाखल केले आहे. गेली अनेक महिने एनआयएचे पथक जतिंदर सिंगच्या शोधात होते.