अल्लू अर्जून विरोधात पोलिसांकडून आणखी एक नोटीस, उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश

हैदराबाद पोलिसांनी संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जूनला नोटीस बजावली आहे. पोलिसांनी अल्लू अर्जूनला सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं आहे. चिक्कडपल्ली पोलिसांनी अल्लू अर्जूनला ही नोटीस दिली आहे.

चार डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चा प्रिमीयर झाला. यावेळी अल्लू अर्जूनही या प्रिमीयरला उपस्थित राहिला होता. यावेशी अल्लू अर्जूनचे मोठ्या प्रमणात फॅन्स आले होते. आणि यावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अल्लू अर्जून आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अल्लू अर्जूनला अटकही करण्यात आली होती. एक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अल्लू अर्जूनही जामिनावर सुटका झाली.