बोलणे महागल्याने जिओचे सबक्रायबर्स घटले, BSNLला पसंती

नामांकित टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे मागील 4 महिन्यांत तब्बल 1.64 कोटी सबक्रायबर्स कमी झाल्याने कंपनीला मोठा फटका बसला. दुसरीकडे सरकारी कंपनी बीएसएनएलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच रिलायन्स जिओकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसते.

ऑक्टोबर महिन्यात रिलायन्स जिओला एकूण 37.6 लाख सबक्रायबर्सचा फटका बसल्याचे वृत्त आहे. तर दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलने ऑक्टोबरमध्ये 5 लाख नवीन ग्राहक जोडले. सप्टेंबर महिन्यात कंपनीचे 14.3 लाख सबक्रायबर्सचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यात कंपनीला काहीसे यश आले. ऑक्टोबर महिन्यात व्होडाफोन आयडियाच्या सबक्रायबर्समध्ये 19.3 लाखांनी घट झाली. सलग दुसऱ्या महिन्यात कंपनीने मोठय़ा प्रमाणात सबक्रायबर्स गमावले.