देशातील जनता महागाईने होरपळत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अनेक संकटांचा मुकाबला करत आहे. मणीपूर अजूनही धुमसत आहे. सीमाभागात चीनची घुसखोरी आणि कश्मिरी पंडितांच्या समस्या वाढतच आहे. त्यातच बांगलादेशात हिंदुवर हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात आहेत. तसेच निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. त्यांच्या परदेश दौऱ्यावर आणि जाहिरातींवर तब्बल 66 अव्ज रुपयांचा खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या साडेचार पंतप्रधानांनी एकूण 84 परदेश दौरे केले असून त्यावर 2,000 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. त्यांचे अमेरिका दौरे 5 वेळा झाले आहेत. तर सरकारी जाहिरांतीवर 4,607 कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या साडेचार वर्षात NDA सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आणि सरकारी जाहिरातींवर 920 दशलक्ष डॉलर ( अंदाजे 6,622 अब्ज रुपये) खर्च केले आहेत. त्यापैकी केवळ 280 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2,000 कोटींहून अधिक रक्कम पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर खर्च झाली आहे. त्याच वेळी 640 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 4,607 कोटी रुपये सरकारी धोरणांशी संबंधित जाहिरातींवर खर्च केले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मोदींच्या परदेश दौऱ्याशी संबंधित माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान मोदींनी 84 वेळा परदेश दौरा केला. तथापि, त्याच्या परदेश दौऱ्यादरम्यान सर्वात मोठा खर्च एअर इंडिया वनच्या देखभालीवर आणि सुरक्षित हॉटलाइन उभारण्यावर झाला. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला विदेश दौरा जपानला होता.
पंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोठ्या देशांमध्ये अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, रशिया आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. त्यांनी 5 वेळा अमेरिकेला भेट दिली आहे, तर फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंडला तीन वेळा भेट दिली आहे. ही माहिती उघड झाल्यावर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या सततच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चावर हल्लाबोल केला आहे.