PV Sindhu: पी.व्ही सिंधु अडकली लग्नबंधनात, लग्नाचा फोटो आला समोर

हिंदुस्थानची प्रसिद्ध बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधु वेंकट दत्ता साई याच्यासोबत  विवाह बंधनात अडकली आहे. तिने राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न केले. सिंधूच्या लग्नामध्ये अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. वेंकट दत्ता साई हा उद्योजक असून त्यांचे लग्न हिंदु विधीपरंपरेनुसार झाले आहे.

केंद्रिय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पीव्ही सिंधूच्या लग्नात उपस्थिती लावली होती. त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केला होता. तिने लग्नात जवळचे नातेवाईक आणि काही दिग्गजांना आमंत्रित केले होते. आज हा विवाह सोहळा पार पडला असून मंगळवारी रिसेप्शन होणार आहे. सिंधूने लग्नात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित केले होते. सिंधूचे लग्न उदयपूरच्या हॉटेल राफेल्समध्ये झाले आहे.

लग्नासाठी नववधू कायम लाल रंगाच्या जोड्यात दिसते. पण सिंधूने तिच्या लग्नात मोती रंगाची साडी निवडली आहे. ती त्यात खूपच सुंदर दिसत आहे.